Loading...


Brand Identity - ब्रँडचा चेहरा आणि आत्मा: लोगो मिशन आणि व्हिजन कसे तयार कराल

तुमचा व्यवसाय कितीही छान असला तरी, त्याची ओळख आणि ग्राहकांमध्ये त्याबद्दल एक ठराविक भावना निर्माण करणं महत्वाचं आहे. यासाठी ब्रँड आयडेंटिटी तयार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चला, मग जाणून घ्या की लोगो, मिशन आणि व्हिजन कशाप्रकारे तुमच्या ब्रँडला आकार देतात!

लोगो: ओळख निर्माण करा!

तुमचा लोगो हा तुमच्या ब्रँडचा चेहरा असतो. लोगो हा साधा, आकर्षक आणि लक्षवेधी असावा लागतो, जेणेकरून लोक लगेच त्याला ओळखू शकतात. एक क्यूट आणि व्यावसायिक लोगो तुम्ही निवडला, तर तुमचा ब्रँड कायमच आठवणीत राहिलं!

🔹 उदाहरण: Nike चा स्वोश चा लोगो, किंवा Apple चं सिम्पल ॲपल लोगो, हे दोन्ही खूप ओळखता येतात.

मिशन: तुमच्या व्यवसायाचा उद्देश काय आहे?

तुमचा मिशन स्टेटमेंट म्हणजे तुमचं ब्रँड का अस्तित्वात आहे, आणि तुम्ही ग्राहकांच्या जीवनात कोणता फरक आणू इच्छिता. हे स्पष्ट असायला हवं.वाचकांना तुमचं ब्रँड का निवडावं याची एक ठोस कारणं सांगणारा संदेश.

🔹 उदाहरण: Toms चं मिशन – "एक जोडी शूज विकून दुसरी जोडी दान करने ".

व्हिजन: भविष्याची प्लॅनिंग काय आहे?

तुमचा व्हिजन स्टेटमेंट म्हणजे तुमचं भविष्य. यामध्ये तुम्ही कशावर विश्वास ठेवता, तुमचं उद्दीष्ट काय आहे, आणि भविष्यात तुमचं ब्रँड कुठे पाहायचं आहे.

🔹 उदाहरण: Tesla चं व्हिजन – "सस्टेनेबल एनर्जीच्या वापरासाठी एक वैश्विक बदलाव आणने".

ब्रँड आयडेंटिटी कशी तयार करावी?

1️⃣ तुमचं ध्येय ठरवा: तुमचा ब्रँड नेमके काय करतो आणि त्याचा उद्देश काय आहे हे ठरवा.

2️⃣ लोगो आणि डिझाइन विचार करा: लोगो आणि डिझाइन साधं, लक्षवेधी आणि आकर्षक ठेवा.

3️⃣ मिशन आणि व्हिजन लिहा: तुमच्या ब्रँडचे ध्येय आणि भविष्यातील दिशा स्पष्टठरवा.

4️⃣ ग्राहकांशी संवाद साधा: तुमच्या ब्रँडच्या मूल्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचवा.

ब्रँड आयडेंटिटी तयार करणं म्हणजे तुमच्या ब्रँडला एक ओळख आणि व्यक्तिमत्त्व देणं! तुमचा लोगो, मिशन आणि व्हिजन यामुळे ग्राहक तुमच्याशी जोडले जातात आणि तुमच्या ब्रँडला दीर्घकालीन विश्वास मिळतो. 🌟

तर, तुमच्या ब्रँडची ओळख कशी असावी, तुमचं मिशन आणि व्हिजन काय आहे हे ठरवून ब्रँड आयडेंटिटी तयार करा आणि आम्हालाही नक्की कळवा ! 🚀किंवा काही अडचण येत असल्यास आमच्या बिजनेस डॉक्टर सोबत बोला .


Talk to our business doctor

Comments

Leave a Comment

Related Blogs

https://www.etaxwala.com/public/blogs/a879fd177fea83a9450f3ba03d99149b.jpg
Market Research & Analysis: The Secret Weapon Behind Great Marketing, Branding, Ads & Promotions

Read More

https://www.etaxwala.com/public/blogs/6bdbc75c402f74a67e865ba7e07677d0.jpg
How to Establish a Brand Identity That People Actually Remember

Read More

https://www.etaxwala.com/public/blogs/90c2968891481e58169fecfec985adb5.jpg
Digital Marketing 101: SEO, Social Media & Content Marketing—Made Simple!

Read More